Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हामहिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; गुन्हा दाखल!

महिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; गुन्हा दाखल!

महिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी ; गुन्हा दाखल!

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील लोण बु. येथे एका महिलेचा विनयभंग झाल्याने दोन गटात हाणामारी झाली. ही घटना दि. २९ रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. परस्परांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,लोण बु. येथील ३० वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ती महिला घरी असताना त्यांच्या शेजारी राहणारा नरेश महारू पाटील हा बळजबरी घरात घुसला आणि सदर महिलेला पकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला. तिचे तोंड दाबून तुला नंतर पाहतो, असे म्हणत कोणाला सांगितले तर पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा आवाज ऐकून तिची मुले व पती घरात आल्याने नरेश व महिलेच्या पतीची झटापट झाली. त्यावेळी नरेश पळून जात असताना पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत झाली. या प्रकाराने महिला घाबरून गेल्याने उशिराने मारवड पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीनुसार, नरेश महारू पाटील हा घरगुती कार्यक्रमासाठी लोण पंचम येथे गेला होता. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे खंडेराव चुडामन पाटील, प्रशांत सुनील पाटील, संदीप खंडेराव पाटील व सुनील चुडामन पाटील यांनी त्यांच्या घरावर दगडफेक करीत शिवीगाळ केली.

दरम्यान, नरेश हा घरी आल्यानंतर त्याने प्रशांतला माझ्या पत्नीला त्रास देतो म्हणत लोखंडी टॉमी डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच खंडेराव व सुनील यांनी लोखंडी सळई व रॉडने मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या