महिलेच्या हत्या प्रकरणी संशयित एलसीबीच्या ताब्यात !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मद्यपीपतीने कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि. परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री घडली होती. पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, किशोर डिगंबर पाटील यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रमांक ६५१ मध्ये शेत असून या शेतात अली हुसेन इसाक कुरेशी हे वीटभट्टी चालवतात. या वीटभट्टीवर कामासाठी परळी जिल्ह्यातील काही कुटूंब आले आहेत व तेथेच त्यांचा कुटूंबातील सदस्यांसह रहिवास आहे. अझहर नियोजोद्दीन शेख (वय २४, जुने स्टेशन परळी वैजनाथ, जि. बीड, ह. मु. वेल्हाळा शिवार) ह देखील आपली मोठी बहिण सना व मेहुणा अजीज शेख तसेच आई, वडिल, भाऊ, वहिनी आदींसह वीटभट्टीवर कामाला आहेत. संशयीत अजीज शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो सना शेख यांचा सातत्याने छळ करून मारहाण करीत होता व हा दररोजचा प्रकार असल्याने यास सर्व कंटाळले होते. शनिवारी अझहर शेख, शर्पू, कृष्णा, ज्वाला, अजीज शेख यांनी वरणगाव येथे बाजारासाठी येत बाजारहाठ केला व यावेळी पुन्हा अजीज शेख याने मद्य प्राशन करून रात्री सव्वाआठ वाजता वीटभट्टी गाठली. मध्यरात्रीच्या सुमारास अजीज शेख याने पत्नी सनासोबत पुन्हा वाद घातला व दारूच्या नशेत तिचा गळा आवळला.निपचीत झोपल्या असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दार तोडून खोलीत प्रवेश केला असता सना यांच्या नाकातून रक्त येत असल्याने कुटूंबाने त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत मध्यरात्रीच – खुनानंतर पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता. खुनानंतर पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यात जळगाव गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी बेड्या ठोकल्या. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली.