Sunday, April 27, 2025
Homeगुन्हामहिलेला नोकरी शोधणे पडले महागात : ५ लाखात लुटले !

महिलेला नोकरी शोधणे पडले महागात : ५ लाखात लुटले !

महिलेला नोकरी शोधणे पडले महागात : ५ लाखात लुटले !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – टास्क पूर्ण करून नफ्याचे आमिष दाखवत पहिल्या दोन टास्कवर नफा तर दिला, मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे सांगत सोनल नितीन पाटील या ४० वर्षीय महिलेची पाच लाख २९ हजार ६१६ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ६ ते १४ जानेवारी दरम्यान घडला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, महिलेच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळची पुणे येथील रहिवासी असलेल्या सोनल सध्या जळगावातील मनीषा कॉलनी परिसरात राहतात. चार जणांनी टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये त्यांना सहभागी करून घेतले. महिलेला टास्कची माहिती देऊन त्यातून नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यांनी दोन टास्क पूर्ण केल्यानंतर त्यांना नफा दिला; मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचे महिलेला सांगण्यात आले.
फसवणूक झालेल्या महिला दीड वर्षांपूर्वीच जळगावात रहायला आल्या. पूर्वी त्या एका फार्मा कंपनीत कामाला होत्या. आता त्या कामाच्या शोधत असल्याने त्यांनी त्यांचा बायोडाटा टेलीग्रामवर टाकलेला होता. सायबर गुन्हेगारांनी टेलीग्रामवरून महिलेशी संपर्क साधून घरबसल्या तुम्हाला टास्कचे काम दिले जाईल, असे सांगितले. त्यानुसार महिलेने होकार दिल्यानंतर टास्क देण्यात येऊ लागला व नंतर त्यांची फसवणूक करण्यात आली.पहिल्या दोन टास्कवर नफा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. त्यामुळे त्या दिलेला टास्क करू लागल्या; मात्र नंतर टास्क चुकीचा केल्याचा समोरील व्यक्तींनी दावा करीत त्यांच्याकडून रिकव्हरी म्हणून वेगवेगळ्या कारणांनी रक्कम वसूल करीत गेले.

घेतलेल्या रकमेवर कोणताही मोबदला न देता ६ ते १४ जानेवारी दरम्यान वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण पाच लाख २९ हजार ६१६ रुपये घेतले. युपीआय, बँक खाते, आरटीजीएस अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारण्यात आली. एवढी रक्कम देऊन मोबदला मिळत नसल्याने व मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या