Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हामहिलेला लग्नाचे आमिष देत अत्याचार ; गुन्हा दाखल!

महिलेला लग्नाचे आमिष देत अत्याचार ; गुन्हा दाखल!

महिलेला लग्नाचे आमिष देत अत्याचार ; गुन्हा दाखल!

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील झाडी येथील ३७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील झाडी येथील ३७वर्षीय महिलेची ओळख २००८ मध्ये चारूदत्त विलास पाटील (वय ३७, रा. झाडी, ह.मु. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर) याच्याशी झाली होती. महिलेचा पती दारू पीत असल्याने चारूदत्त याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. सदर महिला पतीसोबत नाशिक येथे राहायला गेली असता नाशिक येथेही तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याला कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर येथे नोकरी लागल्याने तो तेथे निघून गेला. सदर महिलेचे फोन उचलणे बंद केल्यानंतर तिने समक्ष जाऊन जाब विचारला असता त्याचे इतर महिलेशी ही अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले व त्यावेळी त्याने पीडित महिलेला लग्नास नकार दिला आणि शिवीगाळ करत मारहाण केली.

या त्रासाला कंटाळून महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात चारूदत्त याच्याविरोधात फिर्याद दिली, यानंतर दि. ६ रोजी ती फिर्याद मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. तपास पोउनि विनोद पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या