महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार ; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास!
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एका महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील टोळी येथील आरोपी शिवनंदन शालिक पवार (वय ३६) यास अमळनेर न्यायालयाने २८ रोजी १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल होता.
या गुन्हयामधील आरोपी शिवनंदन पवार याने एका पीडितेस लग्नाचे अमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. ही घटना ८ नोव्हेंबर २०२० रोजी घडली होती. या खटल्यात आरोपी पवार यास १९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक केली होती. तेव्हापासून हा आरोपी जेलमध्येच होता. तदर्थ व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सौ. सी. व्ही. पाटील यांच्यापुढे या खटल्याचे कामकाज चालले. यात सरकारी वकील आर. बी. चौधरी यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी तसेच मयत पीडितेची आई व बहिण यांना पीडिताने मृत्यूपूर्वी तोंडी घडलेली घटना सांगितली होती. त्यास पुरक असा जबाब धुळे यथील वैद्यकिय अधिकारी आर. के. गढरी यांनी दिला. ही साक्ष ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपी पवार यास भा.द.वि कलम ३७६ या कलमात १० वर्षे शिक्षा व २० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तर इतर कलमातून आरोपीला निर्दोष मुक्त केले. यासाठी पैरवी अधिकारी सहायक फौजदार उदयसिंग सांळुके, पो.हे.कॉ. पु. शा. वाल्डे, पो.हे. कॉ. प्रमोद पाटील तसेच पो.कॉ. भरत इशी व राहुल रणधीर यांनी सहकार्य केले.