Sunday, April 27, 2025
Homeगुन्हामाजी उपसरपंच खून प्रकरण : दोन भावांना केली अटक

माजी उपसरपंच खून प्रकरण : दोन भावांना केली अटक

माजी उपसरपंच खून प्रकरण : दोन भावांना केली अटक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील कानसवाडा-शेळगाव ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी (वय ३८, रा. कानसवाडा) यांच्या खूनप्रकरणी परेश उर्फ सोन्या भरत पाटील (वय २६) व देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील (वय २४, दोघ रा. शेळगाव, ता. जळगाव) या दोघं भावांना नशिराबाद पोलिसांनी अटक केली. मात्र या दोघांचा बाप भरत भास्कर पाटील हा पसार असून त्याचा शोध घेतला जात आहे. अटकेतील दोघांना दि. २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ग्रामपंचायतच्या कामकाजाच्या जुन्या वादातून माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा दि. २१ मार्च रोजी सकाळी शेतात खून करण्यात आला होता. यातील देवेंद्र पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २१ रोजी अटक केली होती. तर दुसरा संशयित परेश पाटील याला नशिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि ए.सी. मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि रवींद्र तायडे, पोहेकॉ शरद भालेराव, प्रशांत विनारे, पोकॉ रुपेश साळवे, सागर बिडे यांच्या पथकाने रात्री उशिरा अटक केली. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या