माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नावाचा फलकच नाही
यालाच म्हणतात शैक्षणिक दर्जा!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल तालुक्यात एक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात प्रवेशद्वाराजवळ किंवा इमारतीवर किंवा विद्यालयाच्या इमारतच्या आजूबाजूला विद्यालयाच्या नावाचा फलक लावलेला नसल्याने यालाच शैक्षणिक दर्जा वाढल्याचे म्हणायचे का..? असा प्रश्न यावल तालुक्यात उपस्थित होत आहे.यावल तालुक्यात एक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे परंतु या विद्यालयाच्या नावाचा फलक विद्यालयाच्या दर्शनी भागावर,प्रवेशद्वारावर किंवा विद्यालयाच्या इमारतीवर कुठेही लावलेला नाही,मात्र विद्यालयातील व्हऱ्याड्ड्यात एका फलकावर खडूने ( ऑइल पेंट नव्हे ) विद्यालयाचे नाव लिहिलेले आहे.
यालाच शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा म्हणायचे का..? याचा खुलासा जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जनतेच्या माहितीसाठी करायला पाहिजे अशी चर्चा यावल तालुक्यात आहे.