मामांच्या घरी आलेल्या १८ वर्षीय तरुणीने संपविले आयुष्य !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील भोंडण येथे १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (वय १८, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, नाशिक येथील मराठा कॉलेजमध्ये पायल ही बारावीचे शिक्षण घेत होती. ती बारावीच्या परीक्षेनंतर सुट्टी असल्याने भोंडण येथे सतीश सुखदेव सोनवणे या मामांच्या घरी आली होती. दरम्यान, २७ रोजी रात्री सर्वजण एकत्र जेवण करून झोपल्यानंतर तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील लोखंडी छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास लघुशंकला उठलेल्या मामाने ही घटना पाहिली. त्यानंतर त्यांनी पायल शिंदे या तरुणीला खाली उतरून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले, परंतु, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.