मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज
कैलास कोळी मुक्ताईनगर प्रतिनिधी
मुक्ताईनगर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी महायुतीचे भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चंद्रकांत पाटील हे धनुष्यबाण चिन्हावर एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे .याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की

माझ्याशिवाय या मतदारसंघात एबी फॉर्म सहीत दाखल केला असेल असे वाटत नाही अशी खोचक टिका रोहिणी खडसें यांचे नाव न घेता केली आहे
महायुतीचे सरकार बहुमताने येईल यात शंका नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.