मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी मुक्ताईनगर येथील इंग्रजी विभागाने पीएम उषा या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगारक्षमता कौशल्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ( Certificate Course in Employability Skills ) यशस्वीपणे आयोजित केला. हा अभ्यासक्रम जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडला. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात आली. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला.

अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व अभ्यास साहित्य महाविद्यालयाकडून पुरवण्यात आले. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनवणे हा होता, आणि तो उद्देश साध्य करण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचे प्रतीक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यांना भविष्यातील संधींसाठी एक मजबूत पाठबळ देणार आहेत.