मुक्ताईनगर येथील कथित छेडछाड प्रकरणात आरोपींना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी!
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यात्रोत्सवात गेलेल्या अल्पवयीन मुलीसह १८ वर्षीय मुलीची छेडखानी करण्यात आली होती.
सदरचे प्रकरण महाराष्ट्र भर गाजत असुन त्यात एक राजकिय पक्षाचा संबंध असल्याचे बोलले जात आहे
याप्रकरणी सात संशयीतांविरोधात रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तीन आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे तसेच अन्य एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले होते.
अटकेतील तिघांना भुसावळातील अतिरीक्त जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .
याप्रकरणात तीन संशयीत पसार असून त्यांना शोधण्यासाठी तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
२८ फेब्रुवारी रोजी कोथळी गावातील यात्रोत्सवात भाजपा महिला लोकप्रतिनिधीची कन्या तिच्या अन्य मैत्रिणी पाळण्यात बसण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी त्यांचा पाठलाग केला तसेच मोबाईलमध्ये फोटो काढून व्हिडिओ काढले होते.
सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचार्याला संशयीतांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सुरूवातीला पाच संशयीतांविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर रविवारी १८ वर्षीय मुलीचा तसेच अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणा मुळे जिल्हा भरात संताप व्यक्त होत असुन लोकप्रतिनिधीच्या कन्याच असुरक्षित तर इतरांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे