Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हामुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणतं शेतकरीला १० लाखांचा घातला गंडा!

मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणतं शेतकरीला १० लाखांचा घातला गंडा!

मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणतं शेतकरीला १० लाखांचा घातला गंडा!

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पहूर येथील येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील यांना दोन जणांनी मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पहूर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आली आहे, तर दुसरा फरार आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, जितेंद्र भागवत थाटे (३५, रा. विवेकानंद नगर, जळगाव) आणि तुषार दीपक गावंडे (३०, रा. गिरिजा कॉलनी जामनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी तुषार हा अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहूर येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी रेल्वेच्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. पाटील यांच्या पत्नीच्या कार्यालयात ज्ञानेश्वर तुकाराम महाले नोकरीला आहेत. यांच्याबरोबर मुलीच्या नोकरीची चर्चा झाली. त्यांनी रेल्वेत नोकरीला लावून देणाऱ्या वरील दोघांची माहिती दिली. गजानन पाटील व पत्नी दोघेही या युवकांना भेटले. त्यांनी नोकरी लावून देतो. रेल्वे विभागात आमची पक्की ओळख असल्याचे पाटील दाम्पत्याला सांगितले. इतर युवकांच्या नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र त्यांनी दाखवले.

गजानन पाटील यांनी बँक खात्यातून १२ ऑक्टोबर २०२२ ते १० मार्च २०२३ पर्यंत दहा लाख या संशयितांना दिले. पण दोन वर्षे उलटूनही नियुक्ती पत्र मिळत नसल्याने पाटील यांनी युवकांकडे तगादा लावला. त्यावर संबंधितांनकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. जितेंद्र व तुषार यांनी त्यांचे धनादेश दिले मात्र बँकेत धनादेश वटले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पहूर पोलिसात वरील दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या