मूलभूत नागरी सुविधा साठी रामराज्य संस्थेचे लाक्षणिक उपोषण : समस्या न सोडविल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
ऐतिहासिक फैजपूर नगरपालिकाचे मूलभूत नागरी सुविधा देण्याबाबत सुस्त तथा कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी रामराज्य सेवाभावी संस्था च्या माध्यमातून दिनांक २६ डिसेंबर गुरुवार रोजी हक्काचा लढा लक्षणिक उपोषण द्वारे २६ जानेवारीला आमरण उपोषणाचा अंतिम इशारा देण्यात आला आहे हभप नरेंद्रभाऊ नारखेडे यांच्या हस्ते संस्थाध्यक्ष संजय सराफ यांनी चहा घेवून उपोषण सोडण्यात आले. प्रमुख मागण्या अशा शहरातील राष्ट्र पुरुषांची पुतळ्याची नियमित स्वच्छता करून त्यांना माल्यार्पण करणे
आठवडे बाजारातील बहू प्रतिक्षित सुलभ सौच्चालय महिला साठी तात्काळ लोकार्पण होणे, आठवडे बाजारात खुलेआम होणारी मास विक्री अन्यत्र हलविणे, आठवडे बाजारात शेतकरी वर्गासाठी राखीव जागा ठेवणे, आठवडे बाजार व शहरातील स्वच्छता नियमित सर्वत्र होणे, शहरातील वर्षानु वर्षे गटाराचे सांडपाणी ची तात्काळ योग्य विल्हेवाट लावणे, या साचलेल्या घाण सांडपाणी वर नियमित जंतूनाशक फवारणी तात्काळ करणे, फैजपूर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेतील सुमारे ५ वर्षापासुन बंद असलेला भोंगा तात्काळ पूर्ववत चालू करणे, पाणी मुबलक उपलब्ध असूनही सद्य स्थितीला लोड शेडींगच्या नावा खाली कुत्रीम पाणी टंचाई भासवून अनियमित व अवेळी होणारा पाणी पुरवठा नियमित करणे, शहरातील बंद पथदिवे तात्काळ दुरुस्ती करणं करणे
या मागण्या करण्यात आल्या आहे.
या अत्यावश्यक सर्व सामान्य मूलभूत सेवा तात्काळ नियमित पणे पूर्ववत चालू करव्यात अन्यथा येत्या २६ जानेवारी २०२५ पासून बेमुदत उपोषण आंदोलन छेडू. यास्तव होणारे सर्व परिणाम जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची असेल यांची नोंद घ्यावी.
यावेळी नगरपालिका चे अधिकारी संगीता बाक्षे, ऋतुजा पाटील, सूरज नारखेडे यांनी तर प्रांतधिकारी बबनराव काकडे यांनी निवेदन स्वीकारले. मुख्याधिकारी आल्यानंतर सर्व मागण्या सोडविण्या साठी आश्वासन दिले.
याप्रसंगी रामराज्य सेवाभावी संस्थानचे संजय सराफ, अतुल महाजन, युवराज चौधरी, निलेश कोल्हे, अनुराधा परदेशी, मृणाली राणे, भारती पाटील, ऍड. गुंजन वाघोदे,भागवत पाटील, नरेंद्र नारखेडे, चंद्रशेखर चौधरी,अनंत नेहेते,गोलू पाटील, पिंटू मंडवाले, शेख रियाज, मलक शाकीर, किशोर कपले,तनुजा सराफ, भागश्री भंगाळे, सुरेखा टोके, लता हिरे,अतुल कापडे, वसंत परदेशी, नितीन नेमाडे सह शहर वासिय मोठया संख्येने सहभागी झाले.