मैत्रीला काळिमा : पैशासाठी मित्राच्या गळ्याला लावला चाकू !
पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील पिंपळगाव हरे.पोलिसांनी एका गुन्हाच तपास करत मित्राच्या कृत्याचा पर्दाफाश केला आहे. एकाच कंपनीत काम करणारे मित्र दुचाकीवर जात असताना त्याच्या मानेवर चाकू लावून त्याला जखमी करीत, त्याच्याजवळील ५४ हजार रुपये लुटून मित्रानेच पोबारा केला होता. ही धाडसी चोरी दि. १७जानेवारी रोजी, बांबरुड रस्त्यावरील लोहारा सबस्टेशनजवळ घडली होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे, पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. अजय वासुदेव बोधडे (रा. वसाडी, ता. नांदुरा, ह. मु. एरंडोल) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी संशयित आरोपी रोहित चौधरी याला कळमसरा गावातून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दि. १८ रोजी, गुन्हा रजिस्टर नंबर ०८ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी रोहित सुधाकर चौधरी (वय २३, रा. कळमसरा, ता. पाचोरा) फरार होता. तो त्याच्या गावात आला असल्याची माहिती सपोनि प्रकाश काळे यांना मिळाली.
सहायक फौजदार अरविंद मोरे, पोहेकॉ शैलेश चव्हाण, प्रमोद वाडिले यांनी दि. ५ रोजी, संशयिताला कळमसरा गावातून त्याब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला एक चाकू, मोटरसायकल, फिर्यादीचे हिसकावलेले ३० हजार रुपये जप्त केले. गुन्हा उघडकीस आणण्यात सपोनि प्रकाश काळे, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहायक फौजदार अरविंद मोरे, पोहेकॉ शैलेश चव्हाण, प्रमोद वाडीले, अतुल पवार, दीपक अहिरे, प्रमोद वाडीले, योगेश भिलखेडे यांनी मदत केली.