Thursday, March 27, 2025
Homeजळगावमोठी बातमी : गिरणा धरणाचे दोन दरवाजे उघडले !

मोठी बातमी : गिरणा धरणाचे दोन दरवाजे उघडले !

मोठी बातमी : गिरणा धरणाचे दोन दरवाजे उघडले !
जळगाव : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
गिरणा धरणाचे दोन दिवसांपूर्वीच बंद केलेले दरवाजे धरणात पुन्हा पाण्याची आवक वाढल्यानंतर उघडण्यात आले आहेत. मंगळवारी, गिरणा धरणाचे दोन दरवाजे ३० सेंमी. ने उघडण्यात आले असून, धरणातून २,४७६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमधील सरासरी टक्क्यांवर पोहोचली आहे.
९० सन २०२०नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यांमधील पाण्याची टक्केवारी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षी हीच स्थिती ६१ टक्क्यांपर्यंत होती. वाघूर व गिरणा हे दोन्ही मोठे प्रकल्प आधीच १०० टक्के भरले आहेत. हतनूर धरणातील जलसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. १४ मध्यम प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. मोर, मन्याड प्रकल्पही शंभरीकडे जात आहेत.
दोन वर्षांपूर्वीच पूर्ण झालेल्या तापी नदीवरील शेळगाव प्रकल्पामध्ये गेल्या वर्षी ५० टक्क्यांपर्यंत जलसाठा ठेवण्यात आला होता. यंदा १०० टक्क्यांपर्यंत जलसाठा करण्यात येणार आहे. शेळगाव बॅरेजमधील जलसाठा ७० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या