Sunday, April 27, 2025
Homeजळगावमोहराळा ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून कार्यवाही करा भीम आर्मी भारत एकता मिशनची...

मोहराळा ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून कार्यवाही करा भीम आर्मी भारत एकता मिशनची मागणी.

मोहराळा ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करून कार्यवाही करा भीम आर्मी भारत एकता मिशनची मागणी.

यावल दि.१८   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहराळा येथे सन २०२१ ते २०२३ मध्ये झालेल्या बोगस कामाची
चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन यावल रावेत प्रचार प्रसार प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकार यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावल पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी बा.का.पवार यांच्याकडे लेखी निवेदन दिले.
भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे आयु.गौरव भरत सोनवणे रा. मोहराळा तालुका यावल यांनी यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बीके पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की ग्रामपंचायत मोहराळा ग्रुपग्रामपंचायत कार्यालय यांच्या माध्यमातून सन २०२१ ते २०२३ या वर्षामध्ये १५ वित्त आयोगा अंतर्गत तसेच इतर योजनेमधून जे कामे झाले आहेत. ते सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे
आहे.त्या सर्व बोगस कामाची चौकशी / ऑडिट करून संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर

 


कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व सदर कामे ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात आली होती.त्यांची सुद्धा चौकशी करून ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने बोगस व निकृष्ट दर्जाचे कामे केली असतील त्यांचे लायसन्स काळ्या यादी टाकण्यात यावे..
वरील पैकी कोणत्याही प्रकारची चौकशी व कारवाई न झाल्यास भीम आर्मी भारत एकता
मिशन या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.. तसेच
वरील दिलेल्या तक्रार अर्ज मध्ये कारवाई न झाल्यास गटविकास अधिकारी यांची मुक संमती
आहे.असे समजण्यात येईल व आपल्या विरोधात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दाद मागण्यात
येईल असे सुद्धा दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर जिल्हा सचिव फिरोज अब्बास तडवी,राहुल जयकर यांची स्वाक्षरी आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या