भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी म्युनिसीपल सुपिरीअर स्टॉफ को ऑप क्रेडिट सोसायटी लि. भुसावळ या संस्थेची दिनांक 18/02/2025 रोजी सभा घेण्यात आली असता संस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदी संस्थेचे संचालकांमधून चेअरमन पदी श्री वैभव सुरेश पवार व व्हाईस चेअरमन पदी श्री किशोर जगदीश सावकारे यांची सर्वानुमते विनविरोध निवड करण्यात आली आहे .
सदर सभेस संस्थेचे सर्व संचालक सर्वश्री. अनिल मधुकर मंदवाडे, वैभव सुरेश पवार, किशोर जगदीश सावकारे, शेख रफिक शेख रोशन, शेख परवेज अहमद सगीर, गजेंद्र रमेश जावळे, वसंत चेनसिंग राठोड, देविदास अंबादास मंदवाडे, अजय मोतीराम केदारे, आदी उपस्थित होते.
तसेच सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एस. डी. उचित, अध्यासी अधिकारी, सहकारी संस्था, भुसावळ यांचे अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले असून त्यांना संस्थेचे सेक्रेटरी राजेश पाटील यांनी सहकार्य केले तसेच नगर परिषदेचे विविध विभागातील कर्मचारी सुध्दा सभेस हजर होते.