Sunday, April 27, 2025
Homeजळगावयाच त्या पलटी झालेल्या डंपर मुळे तलाठ्याला झाला ३० हजाराचा लाभ.

याच त्या पलटी झालेल्या डंपर मुळे तलाठ्याला झाला ३० हजाराचा लाभ.

याच त्या पलटी झालेल्या डंपर मुळे
तलाठ्याला झाला ३० हजाराचा लाभ.

यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
अवैध वाळू प्रतिबंधक कॅम्पचे दिवशी डंपर पलटी झाल्याने तलाठ्याचा ३० रुपयाचा लाभ झाला असेल वृत्त प्रसिद्ध झाल्याने एकाने त्या डंपरचे छायाचित्र पुरावा म्हणून पोहोच केले.

जळगाव कडे जाणाऱ्या रोडवर एका ठिकाणी अवैध वाळू वाहने पकडण्यासाठी महसूलचा कॅम्प लागला होता.कॅम्प ज्या ठिकाणी लागला त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक वाळूचे डंपर पलटी होऊन डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.परंतु त्यात अवैध वाळू असल्याने कारवाई होऊ नये त्यातील वाळू गायब करण्यात आली तसेच त्या डंपरवर वाहन क्रमांक नसल्याने पाटील नामक तलाठ्याला त्यावेळेला त्या रस्त्यावर ३० हजार रुपयांचा लाभ झाल्याचे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये चर्चा आहे या प्रकरणाची चौकशी तहसीलदार यांनी केल्यास तालुक्यात काही एक दोन तलाठी यांचे अवैध वाळू वाहतुकीत बिना क्रमांकाच्या वाहनात शंभर टक्के भागीदारी असून त्यांच्या वाहनांवर वाहन क्रमांक नसून त्याच्यावर महसूल आणि पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे असे वाहतूकदारांमध्ये बोलले जात आहे. तसेच ज्यांची बदली झाली आहे ते काही तलाठी पुन्हा त्याच ठिकाणावर येण्यासाठी शासकीय व राजकीय स्तरावरून जोरदार हालचाली करीत असल्याचे सुद्धा अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये बोलले जात आहे.
तालुक्यात दिवस रात्र गौण खनिज / गाळ / पिवळी माती शेतकऱ्यांच्या नावाखाली सर्रासपणे वाहतूक होत असल्याने यात महसूल आणि तहसीलदार यांची शुद्ध दिशाभूल केली जात जात असून पिवळ्या मातीच्या वाहनांवर ताडपत्री किंवा फट टाकले जात नसल्याने इतर वाहनधारकांना त्या पिवळ्या मातीचा त्रास होत आहे. सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर वाहनांनमुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या