Monday, March 24, 2025
Homeजळगावयावल,महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेवर आधारित पोस्ट स्पर्धा संपन्न.

यावल,महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेवर आधारित पोस्ट स्पर्धा संपन्न.

यावल,महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेवर आधारित पोस्ट स्पर्धा संपन्न.

यावल दि.११   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार,डॉ.सुधीर कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राज्यघटनेला २०२५ मध्ये ७५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त भारत सरकारच्या संविधान गौरव महोत्सवा अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना भारतीय संविधान व राज्यघटना माहितीसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली.या स्पर्धेत दीपिका विजय बरी प्रथम क्रमांक ( प्रथम वर्ष वाणिज्य ) दीक्षा राजू पंडित ( द्वितीय वर्ष कला)तर तृतीय क्रमांक तेजश्री सुनील कोलते ( तृतीय वर्ष कला)हे यशाचे मानकरी ठरले. पोस्ट स्पर्धेत एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.अक्षय सपकाळे,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.सि टी वसावे, प्रा.रूपाली शिरसाट, डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.प्रतिभा रावते,प्रा.रामेश्वर निंबाळकर, प्रा.सुभाष कामडी,प्रा.हेमंत पाटील,प्रा.अर्जुन गाढे,यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या