यावल तहसीलदार,नायब तहसीलदार यांनी पत्रकारांचा केला गौरव आणि सन्मान.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी औ
आज रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एम.एच.तडवी,
यांच्यासह मंडळ अधिकारी सौ.चौधरी,यावल तलाठी गजानन पाटील यांनी जिजामाता जयंती,स्वामी विवेकानंद जयंती पत्रकारांच्या उपस्थितीत साजरी करून व औचित्य साधूत नुकताच पत्रकार दिन सर्वत्र साजरा झाल्याने यावल व फैजपूर येथील येथील पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरव कौतुक केले.तसेच ग्रामीण भागातील सर्व पत्रकारांना सुद्धा स्थानिक मंडळ अधिकारी,तलाठी यांच्या मार्फत सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार असल्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली.या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थित सर्व पत्रकारांनी आयोजक तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.