यावल तहसील कार्यालयात तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी : यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.
यावल दि.१२. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने यावल तालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्त यावल तहसील कार्यालयात येतात परंतु कार्यालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे यांनी आज बुधवार दि.१२ मार्च २०२४ रोजी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांना लेखी निवेदन देऊन तहसील कार्यालयात विविध कामासाठी तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली असता तहसीलदार यांनी ८ दिवसाच्या आत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले.निवेदन देताना
तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, शहराध्यक्ष योगेश पाटील, उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील, चेतन सपकाळे,शाखा अध्यक्ष पिंपरी,महिला शहराध्यक्ष योगिता घोडके,विकी बाविस्कर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.