Monday, April 28, 2025
Homeजळगावयावल तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार  पक्षाची आढावा बैठक...

यावल तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार  पक्षाची आढावा बैठक निरीक्षक काळे यांच्या उपस्थितीत संपन्न.

यावल तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार  पक्षाची आढावा बैठक निरीक्षक काळे यांच्या उपस्थितीत संपन्न.

यावल दि.२९   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार ) पक्षाची आढावा बैठक निरीक्षक भास्करराव काळे,जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली

संघटन वाढीसाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बैठकीस मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात युती सरकारने दिलेल्या आश्वासना नुसार सरसकट कर्ज माफ करावे.या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा भरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणूक साठी कार्यकर्त्यांनी सज्य राहावे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील जिल्हा सरचिटनिस विजय पाटील आदिवासी सेल चे एम.बी तडवी,यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक,तालुका उपाध्यक्ष ललित पाटील,माजी उपनरगरध्यक्ष अकबर खाटीक,
नानाजी पाटील,यावल शहर अध्यक्ष अन्सार खान,सईद भाई, मोहराळा विका चेअरमन किरण पाटील, युवक ता सरचिटणीस मयूर पाटील सामा न्याय ता. अध्यक्ष अरुण लोखंडे शहराध्यक्ष कामराज घारू,बापू जासूद,पितांबर महाजन,सहदेव पाटील,मोहसीन खान,हाजी युसूफ शेठ,ललित पाटील,भैया पाटील,आबीद कच्ची,सद्दाम शेख,भगवान बरडे,ललित तेली,सहदेव पाटील,राहुल गजरे,गिरीश पाटील,तुषार येवले संतोष तायडे,विनोद पाटील,किशोर तायडे कासवे,याकुब तडवी,शरीफ तडवी,जुनेद खान,मण्यार मिस्तरी उपस्तित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मुकेश येवले तर आभार प्रदर्शन पवन पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या