यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी पांडुरंग सराफ तर व्हॉइस चेअरमन पदी अतुल भालेराव यांची बिनविरोध निवड.
यावल दि.८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी फैजपूर येथील तथा शिक्षण क्षेत्रासह राजकारणात,समाजात, सहकारात महत्त्वाची सक्रिय भूमिका असलेले पांडुरंग दगडू सराफ व भारतीय जनता पार्टी मधील लोकप्रिय,सक्रिय,कट्टर समर्थक कार्यकर्ता आणि जिल्हा परिषद सदस्या सविता भालेराव यांचे पती अतुलदादा भागवत भालेराव यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाल्याने चेअरमन,व्हॉइस चेअरमन यांचे संपूर्ण यावल,रावेर तालुक्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.यावेळी झालेल्या सभेत माझी चेअरमन नरेंद्र नारखेडे, संचालक चंद्रशेखर चौधरी, तसेच सिद्धेश्वर सर वाघुळदे,अंनत भाऊ नेहेते,
संदिप भारंबे,नंदू भाऊ अग्रवाल यांच्यासह यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक मंडळ. माझी संचालक,व्यवस्थापक यांच्यासह सामाजिक,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.