Tuesday, April 29, 2025
Homeजळगावयावल नगरपरिषदेने घरकुल योजनेबाबत तसेच शहरातील साफसफाई,विद्युत रोशनी करण्याची भाजपकडून मागणी.

यावल नगरपरिषदेने घरकुल योजनेबाबत तसेच शहरातील साफसफाई,विद्युत रोशनी करण्याची भाजपकडून मागणी.

यावल नगरपरिषदेने घरकुल योजनेबाबत तसेच शहरातील साफसफाई,विद्युत रोशनी करण्याची भाजपकडून मागणी.

यावल दि.७    खानदेश   लाईव्ह    न्युज    प्रतिनिधी.   नगर परिषदेमार्फत घरकुल योजनेची कामे व दुभाजक भिंतींचे रंग काम करून इलेक्ट्रिक पोलवर विद्युत रोषणाई,सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्याची मागणी यावल शहर भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आली.

मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
यावल शहरात मागील २ वर्षा पासून प्रधानमंत्री घरकुल योजनेची कामे रखडले आहे कामांची यादी बनवून सर्व शासन दरबारी पाठपुरावा करावा मंजूर असलेले प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुले लवकरात लवकर कार्यआदेश काढावेत तसेच ज्यांचे प्रधानमंत्री घरकुलाचे हप्ते बाकी आहेत त्यांना
लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी.व शहरातील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नवीन घरकुले कसे मंजूर होतील याचा शासन दरबारी पाठपुरावा करावा तसेच शहरातील बुरुजचौक ते यावल एस.टी.स्टँड पर्यंत असलेल्या दुभाजक भिंतींचे रंगकाम करून इलेक्ट्रिक पोलवर विद्युत रोषणाई करण्याची तसेच सार्वजनिक ठिकाणी दैनंदिन साफसफाई करण्याची मागणी यावल येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी योगेश चौधरी,भूषण फेगडे,रितेश बारी,कोमल इंगळे,सागर चौधरी, नितीन बारी,अनिकेत सरोटे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या