यावल नगरपरिषद जलकुंभावरील वॉचमनच्या अंगावर दगडफेक केल्याने ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
यावल दि.१३ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषदेच्या जलकुंभावरील वॉचमनच्या अंगावर दगडफेक केल्याने यावल पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
याबाबत सविस्तर माहिती अशी की हर्षल राजू पवार वय २४ व्यवसाय नगरपालिका अस्थायी कर्मचारी वॉचमन रा. शिवाजीनगर यावल यांनी काल बुधवार दि.१२ मार्च २०२४ रोजी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,शहरातील एसटी बस स्टॅन्ड जवळील तडवी कॉलनी यावल नगरपरिषदेचा जलकुंभ आहे. या जलकुंभावर अस्थाई कर्मचारी,वॉचमन म्हणून काम करीत असताना तसेच जलकुंभ पाण्याची टाकी भरण्याचे काम करताना तडवी कॉलनीतील अब्बास पटेल आणि त्यासोबत ३ अनोळखी मुले ( नाव गाव माहित नाही ) माझ्या अंगावर तसेच पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाशांच्या मोहोळला सुद्धा दगड मारल्याने आग्या मधमाशांनी मला मोठ्या प्रमाणात चावा घेतला.त्यामुळे मी कसा तरी घाई घाईत पाण्याच्या टाकीवरील जिन्यावरून खाली आलो आणि अंगावर पाणी ओतले माझ्या शरीरात तीव्र आग होत असल्याने मी लागलीच यावल पोलीस स्टेशनला येऊन यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार घेतला,आणि तडवी कॉलनीतील पाण्याची टाकी भरत असताना अब्बास पटेल व त्यासोबतचे अनोळखी तीन मुलांनी मला काही एक कारण नसताना शिवीगाळ करून माझ्या दिशेने दगड फिरकावल्याने माझ्या छातीवर व पाठीवर दगड लागल्याने व त्यातील काही दगडमधमाशांच्या आग्या मोहोळला दगड लागल्याने व त्यावरील मधमाशांनी माझ्या अंगावर जावा घेतला आहे म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने संशयित चार आरोपी विरुद्ध यावल पो.स्टे.ला
बीएनएस १२५,३५२,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.