यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी विद्यालयात २१ व्या शतकातील शिक्षण आणि माहिती कौशल्य व इतर विषयावर पाच दिवशीय कार्यशाळा सुरू.
यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषद संचलित
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डिजिटल साक्षरता आणि जागरूकता,आर्थिक साक्षरता आणि जागरूकता,२१ व्या शतकातील शिक्षण आणि माहिती
कौशल्य,नागरिकत्व कौशल्य व संवैधानिक मूल्य आणि भारताचे ज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिचय या ५ विषयावर अनुक्रमे ५ दिवस कार्यशाळा सुरू झाली आहे.
येथे केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या पीएम श्री योजनेतून विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातील बदलते आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या माध्यमातून वरील दिलेल्या महत्त्वाच्या ५ विषयावर ५ दिवसांची कार्यशाळा सुरू आहे.
या महत्त्वाच्या विषयांची कार्यशाळा सोमवार दि.२४ मार्च २०२५ ते शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ या कालावधीत सुरू असून यासाठी दृकश्राव्य ( प्रोजेक्टर ) माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे,तसेच सदरील विषयांची माहिती व ऍक्टिव्हिटी युक्त पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जात आहे, यासाठी प्रशिक्षणाच्या २ टीम कार्यरत असून त्या खालील प्रमाणे आहेत.
टीम -१- इयत्ता नववी ते बारावी साठी ज्ञानेश्वर पाटील टीम प्रमुख
सौ.वैशाली पाटील प्रशिक्षक
श्यामकांत पाटील प्रशिक्षक
टीम- 2 – इयत्ता पाचवी ते आठवीसाठी विशाल कुमार महाजन टीम प्रमुख विनोद पाटील प्रशिक्षक प्रतीक वाघ प्रशिक्षक
आशिष पाटील प्रशिक्षक
सदरील कार्यशाळा बदलत्या काळातील जबाबदार व जागृत नागरिक होण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे, सदरील कार्यशाळेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब एम.के.पाटील सर,उपप्राचार्य ए.एस.इंगळे, सर,पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर सर, व्ही.टी.नन्नवरे सर,ज्येष्ठ शिक्षक डी. एस.फेगडे सर,पी.एन.सोनवणे सर,एन.डी.नेवे सर,कार्यालयीन प्रमुख एन.के बारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे,त्याबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभत असून विद्यार्थी आनंदाने प्रशिक्षण घेत असून त्यांचा सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे.