यावल न.पा.ने फेसबुक माध्यमातून आपल्या प्रशासकाची आणि
लोकप्रतिनिधी,जनतेची केली शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल.
यावल दि.२२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल नगरपरिषद साफसफाई स्वच्छता इत्यादी कामांची माहिती नगरपरिषदेच्या फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स टाकून प्रसिद्ध करीत असते ४ दिवसापूर्वी फेसबुक वर टाकलेल्या साफसफाई स्वच्छतेची माहिती टाकली खरी पण प्रत्यक्ष ठिकाणावर पूर्ण स्वच्छता केली नसल्याचा पुरावा आजही स्पष्ट दिसून येत आहे.त्यामुळे यावल नगरपरिषद ही प्रशासक तथा प्रांताधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपरिषद शाखा सहाय्यक आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांची शुद्ध दिशाभूल व फसवणूक करीत असल्याने संबंधितांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यास यावल नगरपरिषदेचा भोंगळ कारभार लक्षात आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
यावल शहरात ठीक- ठिकाणी काटेरी झुडपे आणि घाणीचे साम्राज्य.स्वच्छ भारत अभियानासह आमदार अमोलदादा जावळे यांच्या सूचना कचराकुंडीत असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर यावल नगरपरिषदेने यावल पोस्ट ऑफिस समोर केलेली साफसफाई केली परंतु ती साफसफाई अपूर्ण आहे.
यावल परिषदेच्या मालकीच्या जागेवर म्हणजे यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर मोकळ्या जागेवर तसेच विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच काटेरी झाडे- झुडपे मोठ्या प्रमाणात झाली आहे प्रवेशद्वाराजवळ सकाळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक प्रातकाल विधी करीत आहेत, पटांगणावर पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे खालील आरसीसी बांधकाम केलेले पिलर खांब उघडे पडल्याने मला मोठा असलेल्या कुंभाचे भवितव्य धोक्यात आले आहे याकडे यावल नगरपालिकेचे ”अक्षम्य” असे दुर्लक्ष होत असून वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर साफसफाई कर्मचाऱ्यांनी फक्त फोटो सेशन म्हणजे फोटो काढून नगरपरिषदेच्या फेसबुक खात्यावर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन फक्त साफसफाई करीत असल्याचा फोटो काढून ( प्रत्यक्ष साफसफाई न करता ) दिशाभूल करणारे फोटो फेसबुकवर टाकून आपली चमकोगिरी करून घेतली परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी आजही प्रचंड घाणीचे,काटेरी झाडेझुडपांचे साम्राज्य दिसून येत आहे.आणि लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केल्यास यावल नगरपालिकेचा गोंधळ कारभार लक्षात आल्याशिवाय राहणार नाही तरी यावल नगरपालिकेने फेसबुकच्या माध्यमातून नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी आणि लोकप्रतिनिधी आमदार यावल नगरपरिषदेचे जळगाव येथील सहाय्यक आयुक्त यांची शुद्ध दिशाभूल फसवणूक कशी केली आहे हे प्रत्यक्ष दिसून येईल संबंधितांनी यावल नगर परिषदेच्या भोंगळ व चमकोगिरी कारभाराकडे लक्ष केंद्रित करून यावल शहरातील सर्व ठिकाणीची साफसफाई स्वच्छता करण्याबाबत कार्यवाही करावी अशी सर्व स्तरात चर्चा आहे.