Tuesday, April 29, 2025
Homeजळगावयावल न.प.संचलित साने गुरुजी विद्यालयात प.पू. साने गुरुजी जयंती व बक्षीस वितरण...

यावल न.प.संचलित साने गुरुजी विद्यालयात प.पू. साने गुरुजी जयंती व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

यावल न.प.संचलित साने गुरुजी विद्यालयात प.पू. साने गुरुजी जयंती व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

यावल दि.२४  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषद संचलित,पीएम श्री साने
गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे आज मंगळवार दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी परमपूज्य साने गुरुजी जयंती व वार्षिक बक्षीस वितरण व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा संपन्न झाला.

विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्‌घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.के.पाटील सर यांनी केले,विज्ञान प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे विज्ञान तंत्रज्ञानाचे मॉडल तयार केलेले होते.तसेच विद्यालयाचा वार्षिक बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुद्धा साने गुरुजी जयंती निमित्त घेण्यात आलेला होता या यावेळी परमपूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने करण्यात आली, बक्षीस वितरण कार्यक्रमात पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस व शिष्यवृत्ती देऊन तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले, तसेच विज्ञान प्रदर्शन हे तीन गटात विभागण्यात आले होते प्रथम गट पाचवी ते आठवी ,द्वितीय गट नववी ते दहावी आणि तृतीय गट अकरावी ते बारावी, या सर्व गटातून प्रथम ,द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले, तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वाटण्यात आले.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक साहेब एम.के.पाटील सर,उपप्राचार्य ए.एस.इंगळे सर,पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर सर,व्हीं.टी.नन्नवरे सर,ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे सर, पी.एन.सोनवणे सर, एन.डि.नेवे सर,
विद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख एन.के.बारी भाऊसाहेब तसेच पालक वर्गातून रावते दादा,रणधिरे दादा हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख श्रीमती इंदिरा रायसिंग मॅडम यांनी केले तर बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.टी.नन्नवरे सर,यांनी केले सूत्रसंचालन श्री ए.एस.सोनवणे सर,व श्रीमती शारदा माळी मॅडम यांनी केले,परमपूज्य साने गुरुजी जयंती निमित्त विद्यालयाचे उपशिक्षक एच.डी.पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले या सर्व कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी,विद्याार्थी, विद्यार्थिनी मोठ्या उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या