Monday, April 28, 2025
Homeकृषीयावल परिसरात वन्य प्राणी सक्रीय तर वन अधिकारी निष्क्रिय ठरत आहे.

यावल परिसरात वन्य प्राणी सक्रीय तर वन अधिकारी निष्क्रिय ठरत आहे.

यावल परिसरात वन्य प्राणी सक्रीय तर वन अधिकारी निष्क्रिय ठरत आहे.

केळी व्यापाऱ्यावर लांडग्याचा हल्ला.

यावल दि.३      खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     यावल वनविभाग जळगाव कार्यक्षेत्रातील यावल येथील यावल पूर्व व पश्चिम वन विभागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात दिसून आला त्याचप्रमाणे आज गुरुवार दि.३ एप्रिल २०२५ रोजी टेंभी शिवारात एका केळीच्या व्यापारावर लांडग्याने हल्ला केल्याने यावल पूर्व व पश्चिम वन विभागात वन्यप्राणी सक्रिय तर अधिकारी निष्क्रिय झाल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.

तालुक्यात २ ते ३ ठिकाणी बिबट्या दिसल्याने तसेच एका ठिकाणी लहान मुलावर हल्ला करून तो मुलगा माहित झाल्याने वन्य प्राण्यांविषयी ग्रामीण भागात आणि शेतकरी वर्गात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.यावल शहराला लागून असलेल्या काही अंतरावर
टेंभी शिवारात एका केळी
व्यापाऱ्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडलेली शेतकरी, शेत मजूर, केळी कापणारे मजूर आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी कळवळ उडाली आहे.लांडग्याच्या हल्ल्यात व्यापारी जखमी झाले
असले तरी सुदैवाने ते मोठ्या अप्रिय घटनेतून वाचले आहेत. त्यांचे नाव इरफान रशीद खान वय ५२, रा.बाबानगर,यावल हे केळी खरेदी करून कापण्या संदर्भात आकाश बाळू पाटील यांच्या टेंभी कुरण शिवारातील शेतात
दुपारी साधारण १२.३० वाजता मोटरसायकलने जात असताना रस्त्याने अचानक शेताच्या दिशेने
आलेल्या लांडग्याने त्यांच्यावर झडप घालत मोटरसायकलवर हल्ला केला.लांडग्याने सरळ त्यांच्या छातीवर पंजा मारून जखमी केले. यात इरफान खान बालबाल बचावले या
घटनेनंतर लांडगा घटनास्थळावरून पळून गेला.जखमी इरफान खान यांनी या हल्ल्याबाबत माहिती
देताना सांगितले की,“देवाच्या कृपेने मी बचावलो,पण हा प्रकार भीतीदायक आहे.” या घटनेमुळे
परिसरातील शेतकरी,शेत मजुरांमध्ये,नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी सर्व स्तरातून मागणी आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या