यावल पूर्व वनक्षेत्रपाल यांच्या भागात सुद्धा वन्य प्राण्यांची भटकंती.
शेतकरी झाले भयभीत.
यावल दि.७. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. काल यावल वन विभाग जळगाव कार्यक्षेत्रात म्हणजे यावल येथील पश्चिम वन क्षेत्रपालाच्या कार्यक्षेत्रात बिबट्याने एका सात वर्षाच्या आदिवासी मुलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आणि आज पुन्हा पूर्व भागात म्हणजे यावल शहरापासून पासून एक-दीड किलोमीटर अंतरावर सातोद रोडवर शेती शिवारात शेतामध्ये वन्य प्राण्याचे पायाचे ठसे
आढळून आल्याने शेतकरी भयभीत झाले आहे शेतकरी निलेश कडे यांनी वन विभागाला माहिती दिल्याने वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन कोणत्या प्राण्याचे पायाचे ठसे आहे याची पाहणी करून शेतकऱ्यांना शेतात दक्ष राहण्याचे आवाहन केले. यामुळे मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभित झाले आहे.