Wednesday, March 26, 2025
Homeजळगावयावल प्रकल्प अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे ४ तास ठिय्या आंदोलन.

यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे ४ तास ठिय्या आंदोलन.

यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे ४ तास ठिय्या आंदोलन.

आंदोलन कर्त्यांनी घोषणाबाजी देत कार्यालयात केला प्रवेश.

 

यावल दि.५   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयात आज बुधवार दि.५ रोजी आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत शासकीय आदिवासी वस्ती गृहाच्या विद्यार्थी वर्गाचे ४ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले,प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना मोर्चाची पूर्व कल्पना असतांना देखील यावल प्रकल्प अधिकारी पवार हे शासकीय कामानिमित्त जळगांव येथे गेले प्रकल्प अधिकारी यावल व जिल्हाधिकारी जळगांव यांना मोर्चा असल्याची माहिती असतांना सुद्धा जाणून बुजून आजच्याच तारखेला मिटिंगचे आयोजन केले कसे. हा प्रश्न आदिवासींमध्ये उपस्थित केला जात आहे.

 

मिटींगचे आयोजन होते तर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून पाठवता आले असते अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थी यांच्या कडुन व्यक्त केला जात असताना मात्र जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांना विद्यार्थी वर्गाची जाणीव नसल्याचे बोलले जात आहे,कर्मचारी वर्गाला सुद्धा कार्यालयीन काम सोडून कार्यालयाबाहे ऊभे राहण्यास भाग पाडले,मागण्या पुर्ण मान्य झाल्याशिवाय आम्ही ठिय्या आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका विदयार्थी व विद्यार्थिनी घेतली.

आदिवासी मुलांचे शासकिय व आदिवासी मुलींचे शासकिय वसतिगृह जळगाव येथील सर्व विद्यार्थी / विद्यार्थिनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी विकासासाठी डी.बी.टी.योजना सन २०१८ पासून सुरु केली आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दि. ११ नोव्हेंबर २०११ नुसार शासकिय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुसूत्रता आणणेबाबत सुधारित नियमावली हे शासन निर्णय आजच्या महागाईच्या काळात देय असणारी सोयसुविधा अपुरी पडत आहे.मात्र आज घडीला ८ वर्षाचा काळ लोटला असून सुद्धा विद्यार्थ्यांच्या समस्यांची सोडवणुक होण्याऐवजी त्यात खूप वाढ झालेली आहे. व या शासन निर्णय मध्ये सुधारणा करण्यात यावी व सद्याच्या काळात महागाई निर्देशांकामध्ये झालेली वाढ लक्षात घेता वेद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मुलभूत सोय सुविधांमध्ये वाढ करण्यात यावी

 


आगामी ( येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २०२५ हा प्रस्ताव मांडून वरील विषयाचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे.व सरसकट संपूर्ण महराष्ट्रात जिल्हास्तरीय आदिवासी वस्तीगृहात लागू करण्यात यावा व त्यांची अमलबजावणी करण्यात यावी. वरील चारही कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या घटकास कठोर कारवाई करण्यात यावी यावेळी नलाराम रंगा पावरा,पंकज उदयसिंग पावरा, शरद नामदेव माळी,कवी अल्ताफ सलीम तडवी,अर्जुन दयाचंद पावरा,भरत पावरा,पवन पाका, जितेंद्र ठाकरे,पावरा तुषार,निलेश वसावे,बावरा विल्या यांच्यासह
अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते
आंदोलनास उग्र रूप येऊं नये म्हणून यावल पोलीस निरीक्षण प्रदीप ठाकूर यांनी पोलीस बंदोबस्त चौख ठेवला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या