यावल बंदला ९८ टक्के प्रतिसाद.
यावल दि.१६ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
बांगलादेश मध्ये हिंदूवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्हा बंदचे आव्हाहन करण्यात आले होते त्यानुसार यावल शहरात आज शुक्रवार दि.१६ रोजी सकाळपासून ९८% व्यवसायिकांनी आपले दुकाने आपले बंद ठेवत सकल हिंदू समाज आणि एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावल यांना पाठिंबा दिला.
बांगलादेशात हिंदू बांधव मरण पावले आहे त्यांच्या स्मृती पित्यर्थ यावल शहरात वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे, तरी सर्व हिंदू बांधवांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने वृक्षारोपणासाठी प्रतिसाद द्यावा व आपल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली अर्पित करावी असे आवाहन करण्यात आले. आज सकाळी यावल नगरपरिषद “साठवण तलाव” पासून तर श्री खंडेराव मंदिरापासून समोर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण आणि यावल शहर बंदच्या कार्यक्रमात यावल शहरातील सकल हिंदू समाज एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.