यावल बस स्टॅन्ड आवारात सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू.
ठेकेदाराने कामाबाबत माहिती फलक न लावल्याने अनेक प्रश्न उपस्थित.
यावल दि.४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल एसटी बस स्टॅन्ड आवारात गेल्या ५ दिवसापासून कोट्यावधी रुपये किमतीचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले असून कामाच्या ठिकाणी कामासंदर्भात फलक न लावल्याने याकडे यावल आगार प्रमुख तसेच जळगाव विभाग आगार प्रमुख, महाराष्ट्र औद्योगिक डेव्हलपमेंट उपविभागीय अभियंता यांचे दुर्लक्ष होत असून मध्ये दोन-तीन दिवस काम बंद पडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत म्हणून जनतेच्या माहितीसाठी कामाच्या ठिकाणी सदर कामाचा माहिती फलक लावणे संदर्भात संबंधितांनी तात्काळ कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम कोणत्या योजनेतून,कोणत्या विभागामार्फत,किती रुपयाचे आहे..? काम पूर्ण करण्याचा कालावधी काय..? आणि कोणत्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कडून सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे कामाच्या ठिकाणी कामाचे निरीक्षण करणारा अधिकारी कोण..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने संबंधितांनी कामाची माहिती जनतेला माहीत होण्यासाठी तात्काळ फलक लावण्याची कारवाई करावी आणि फलक न लावल्यास पुढील कार्यवाहीस संबंधित जबाबदार राहतील असे सुद्धा बोलले जात आहे.