Thursday, March 27, 2025
Homeजळगावमहसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!

महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!

यावल महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात खुलेआम अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आज सोमवारी २३ सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यासह महसूल पथकाने पकडल्याने राजकारणात,अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.कारवाई होऊ नये म्हणून राजकीय दबाव आणि प्रभाव आणून ट्रॅक्टर सोडवू टाकू,असेही शहरात दबक्या आवाजात चर्चिले जात आहे.

यावल शहरात साई ॲक्वा पाणी लघु उद्योग फर्मजवळ २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दीड ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले. ट्रॅक्टरवर काही कारणांनी डबल दंडाची कारवाई होणार असल्याचे शहरात चर्चिले जात आहे.

वाहन यावल तहसील कार्यालयात केले जमा

तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात गणेश नथु महाजन यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर वाळू अवैध वाहतूक करतांना पकडण्यात आले. बोरखेडा खुर्दचे तलाठी शरीफ तडवी, हिंगोणाचे तलाठी संदीप गोसावी, दहिगावचे तलाठी मिलिंद कुरकुरे, टाकरखेडाचे तलाठी उमेश बाभुळकर, कोतवाल सोनूसिंग राजपूत, बॅकअप टिममध्ये साकळीचे मंडळ अधिकारी सचिन जगताप, कोतवाल गणेश महाजन, यावलचे कोतवाल निलेश गायकवाड, वाहन चालक अरविंद बोरसे यांनी वाहन यावल तहसील कार्यालय येथे जमा केल्याचे समजले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या