यावल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला कौशल्य विकास कार्यशाळेत सहभाग.
यावल दि.२५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्र. प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली कला व विज्ञान महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यशाळेत सहभाग घेतला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व भालोद महाविद्यालय तसेच pm Usha soft component यांच्या संयुक्त विद्यमाने कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे एकदिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्र.कुलगुरु डॉ.सी.टी.इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देऊन प्रगती करण्यासाठी रोजगारासाठी नवनवीन कौशल्य अवगत करून स्व:ताला सिध्द केले पाहिजे शालेय कामकाज,डाटा कलेक्शन, आँनलाईनचे ज्ञान,लघु उद्योग याविषयी प्रा.इंगळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी सध्या स्पर्धेच्या युगात नविन शैक्षणिक धोरणाचा अवलंब करून दर्जेदार गुणात्मक बदल करणे आवश्यक आहे.संगणकाचे परिपूर्ण ज्ञान घेऊन कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे सध्या नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी जास्त प्रमाणात स्पर्धा आहे त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी कौशल्य युक्त शिक्षणावर भर देणे आँनलाईनचे ज्ञान,पावरपाईंन्ट अशी वेगवेगळी कौशल्य अवगत करून रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सुनिल नेवे यांनी मानले
यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. मुकेश चौधरी,प्रा.आर बी इंगळे, डॉ.सुरेश पांडे,प्रा.सी.टी.वसावे,प्रा. हेमंत पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.