यावल महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जाणून घेतली ग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती
यावल दि.२० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी. येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसार सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्र. प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर पंचायत समितीच्याकरारा अंतर्गत ग्रामपंचायत डोंगरसांगवी येथे भेट देऊन कृषी अधिकारी जे.टी. सोनवणे यांनी विद्यार्थिनींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना,बायोगॅस योजनेविषयी माहिती दिली.ग्रामविस्तार अधिकारी पुरुषोत्तम तळेले यांनी शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना,राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना,रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, ग्रामीण रोजगार योजना याविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली. यावेळी सरपंच श्री. रशिद तडवी, उपसरपंच अतुल फिरके उपस्थित होते.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सांगवी गावातील लोकांना विविध योजनांची माहिती दिली घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्र या संदर्भात माहिती देऊन अंगणवाडीला भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ. वैशाली कोष्टी यांनी मानले कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे,डॉ.पी.व्ही.पावरा, सुभाष कामडी यांनी परिश्रम घेतले