Sunday, March 16, 2025
Homeजळगावयावल महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळेचा समारोप.

यावल महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळेचा समारोप.

यावल महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती कार्यशाळेचा समारोप.

यावल दि.९  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व विद्यार्थी विकासविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आत्मनिर्भर युवती सभेच्या सहा दिवसीय कार्यशाळेचा समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय पाटील (जिल्हा समन्वयक व विद्यार्थी विकास विभागप्रमुख कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या धावपळीच्या युगात महिला सर्वच ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात तरीही स्पर्धेच्या युगात परिवर्तन घडविणे आणि नवीन आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे.स्री ही घराची लक्ष्मी म्हणून ओळखली जाते. परंतु स्त्रीला कुठेतरी पुढे जाण्यासाठी संधी शोधली झाली पाहिजे.स्वतःच्या पायावर जगण्यासाठी आत्मनिर्भर झाले पाहिजे नोकरीच्या संधी प्रत्येकाच्या वाटेला येतीलच असे नाही काही वेळा शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही,अशावेळी महिलांनी रोजगारासाठी कौशल युक्त शिक्षणातील ज्ञान अवगत केले पाहिजे ब्युटी पार्लर, शिलाई मशीन, रेशीमच्या धाग्यापासून कपडे शिवणे वर्ष छोटे-मोठे व्यवसाय करून परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आर्थिक उदरनिर्वाहाचे साधन निर्माण केले पाहिजे सांगितले.कार्यक्रमाचे दुसरे वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थिनींनी शिक्षण घेत असताना व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देऊन प्रगती करण्यासाठी स्वतला झोकून दिले पाहिजे मणात कोणताही न्युनगंड न बाळगता निर्णय घेतला पाहिजे,कधीही प्रगतीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नये,सक्षम राहावे सहनशिलता हा सर्वात मोठा स्त्रीयांतील गुण आहे.परिस्थितीवर मात करण्यासाठी यशस्वी महिलांचा आदर्श घेतला पाहिजे असे म्हणत त्यांनी अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांची उदाहरणे दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेत असताना अनेक आव्हान पेलवायला शिकले पाहिजे.यशस्वी जीवन जगण्यासाठी भावी आयुष्याचा विचार करावा करिअर आणि वेळ याचे नियोजन असावे महिलांनी निर्भीडपणे समाजाला तोंड द्यायला शिकले पाहिजे बँक,पोलीस खाते, टपाल विभाग, कृषी विभाग या वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करायला हवे असे सांगितले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थिनींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ.आर.डी.पवार यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी,प्रा.सुभाष कामडी, प्रा. इमरान खान,प्रा.डॉ. संतोष जाधव,प्रा.सि.टी वसावे, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा हेमंत पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे,दशरथ पाटील,मनोज कंडारे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या