Monday, March 24, 2025
Homeजळगावयावल महाविद्यालयात उर्दू भाषेत भाषण स्पर्धा संपन्न.

यावल महाविद्यालयात उर्दू भाषेत भाषण स्पर्धा संपन्न.

यावल महाविद्यालयात उर्दू भाषेत भाषण स्पर्धा संपन्न.

यावल दि.२२   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली उर्दू विभागातर्फे उर्दू भाषेत भाषण स्पर्धा संपन्न झाली.

सार्वजनिक जीवनात संवाद साधण्यासाठी उर्दू भाषा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या कक्षा वृध्दिंगत करण्याची संधी निर्माण करण्यासाठी महाविद्यालयात ही भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत सैय्यद उम्मे फरदा जावेद अली प्रथम ( प्रथम वर्ष कला ) वर्ग तर नळीला अख्तर शेख मोईनुद्दीन द्वितीय वर्ग ( द्वितीय वर्ष कला) क्रमांकाचे मानकरी ठरले
या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,उर्दू विभागप्रमुख प्रा. इमरान खान,डॉ.निर्मला पवार,डॉ. संतोष जाधव,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा. अक्षय सपकाळे, प्रा.सी.टी.वसावे, प्रा प्रशांत मोरे,प्रा.हेमंत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या