Wednesday, March 26, 2025
Homeजळगावयावल महाविद्यालयात गांडूळ खत निर्मिती प्रकल्पावर मार्गदर्शन.

यावल महाविद्यालयात गांडूळ खत निर्मिती प्रकल्पावर मार्गदर्शन.

यावल महाविद्यालयात गांडूळ खत निर्मिती प्रकल्पावर मार्गदर्शन.

यावल दि.१३    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.    येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली प्राणीशास्त्र व भूगोल विभागामार्फत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राणीशास्त्र विभागाचे डॉ.मयूर सोनवणे यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प विषयी मार्गदर्शन करताना म्हणाले की सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खताचा वापर करणे महत्त्वाचे आहे.शेत पिकातील भूसभुशीत जमीन व जमिनीची पोत सुधारण्यासाठी गांडूळ खत महत्त्वाचे काम करते.असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सेंद्रिय खत शेती हे काळाची गरज आहे.शेतीमध्ये नवीन प्रयोग केले पाहिजे शेतकऱ्यांनी कोणतेही उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खत म्हणून गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.राजू तडवी यांनी केले तर आभार प्रा.रूपाली शिरसाठ यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे, डॉ.आर.डी.पवार प्रा.मनोज पाटील,प्रा.संजीव कदम,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.अर्जून गाढे उपस्थित होते.कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमृत पाटील,अनिल पाटील,मिलिंद बोरघडे यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या