यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत पर्यावरण संवर्धन विषयावर मार्गदर्शन.
यावल दि.५ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत पर्यावरण संवर्धन विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर कापडे होते कार्यक्रमाचे
प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यातील शुध्द हवा आणि ऑक्सीजन चांगला मिळवा म्हणून पर्यावरण संवर्धन करणे सध्याच्या काळात सर्वांसाठी आव्हानात्मक बाब आहे मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड यामुळे तापमान वाढले आहे त्यामुळे वृक्ष लागवड करणे आणि वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की वृक्ष संवर्धन करणे म्हणजे जंगल संपत्ती वाचवणे सातपुडा डोंगरातील बऱ्याचशा औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पालापाचोळा कुजल्याने जमिनीची सुपीकता वाढते अती गुरे चराईमुळे जमिनीची धुप होते ती थांबवण्यासाठी बांबू व इतर झाडं लावली पाहिजे असे आवाहन केले
यावेळी कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.आर.डी. पवार,डॉ.प्रल्हाद पावरा,प्रा.मनोज पाटील,प्रा.राजू तडवी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ.संतोष जाधव यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर प्राध्यापकांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.