Wednesday, March 26, 2025
Homeजळगावयावल, महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आय सी टी विषयावर प्रा.इमरान खान यांचे...

यावल, महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आय सी टी विषयावर प्रा.इमरान खान यांचे मार्गदर्शन.

यावल, महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आय सी टी विषयावर प्रा.इमरान खान यांचे मार्गदर्शन.

यावल दि.२४  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत आयसी टी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.इमरान खान यांनी आयसीटी विषयावर माहिती देताना सांगितले की आय सीटी म्हणजे माहिती संप्रेक्षण तंत्रज्ञान हा सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान अवगत करण्यासाठी व्यापक विषय वाटतो परंतु जग पुर्णपणे आँनलाईन माध्यमातून वावरत आहे.त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती संप्रेक्षण तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे त्याचे फायदे दृकश्राव्य माध्यमातून अध्यापन पद्धती सोपी होते,विद्यार्थ्यांना आँनलाईन ज्ञान अवगत होते,स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम आणि मुलाखती संदर्भात परस्पर संवाद साधण्यासाठी अनुभव येतो, शैक्षणिक खेळ आणि आभासी लॅब सिम्युलेशन शक्य होते,आँनलाईन माहिती मिळवण्याची गती आणि कार्यक्षमता वाढते असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी आय सी टी विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की नविन शैक्षणिक धोरण हे स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला गुणवत्ता कौशल्य विकास, संशोधन क्षेत्रातील आवाहन देणारे आहे. त्यात माहिती आणि संप्रेक्षण तंत्रज्ञानाची भर पडली आहे.सध्या शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल संपर्क, इंटरनेटचा झपाट्याने विस्तार होत असल्याने आभासी वर्ग आणि डिजिटल शिक्षणावरील राज्य सरकारचे विविध उपक्रम खासगी क्षेत्रातील संस्था संगणक सहाय्यित वर्ग यांचा समावेश आहे. याचे उदा सांगताना सेल फोन,स्मार्ट फोन, डिजिटल टेलिव्हिजन, ईमेल,रोबोटसह संगणक ही साधने हाताळली पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.अक्षय सपकाळे यांनी केले.तर आभार प्रा. नरेंद्र पाटील यांनी मानले कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील,डॉ. हेमंत भंगाळे, डॉ आर.डी.पवार,प्रा.मनोज पाटील,
प्रा.राजेंद्र थिगळे,डॉ.संतोष जाधव,प्रा.हेमंत पाटील,प्रा.अर्जुन गाढे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे,अनिल पाटील, प्रमोद जोहरे,प्रमोद भोईटे,उदय येवले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या