यावल महाविद्यालयात भूगोल दिन साजरा
यावल दि.२२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. पी. कापडे होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.सी.टी.वसावे यांनी पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ऋतूमध्ये कसे बदल होतात,जलचक्र,
शीलावरण,जलावरण,वातावरण ह्या विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जगाचा अभ्यास करताना भुगोल विषयाचे ज्ञान आवश्यक आहे.त्यात सात खंड,सात महासागर, विश्ववृत्त,मकरवृत्त,कर्कवृत्त,
अवकाशयान,नकाशा वाचन, पृथ्वीवरील तीन मुख्य भूरूपे पर्वत, पठार,मैदान इत्यादी घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.नरेंद्र पाटील यांनी केले प्रा.तर आभार प्रा.अर्जुन गाढे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे,डॉ. आर डी पवार,प्रा.अक्षय सपकाळे, डॉ.संतोष जाधव,प्रा.प्रशांत मोरे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.