यावल महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.
यावल दि.२. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.हेमंत भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले असून आँनलाईनच्या माध्यमातून व्यवहार करीत आहे.ही विज्ञानाची मोठी शक्ती आहे.डॉ.सी व्ही.रमन हे थोर भारतीय शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना २८ फेब्रुवारी १९२० मध्ये जागतिक स्तरावरील पहिला नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते त्यामुळे हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.१९२६ मध्ये त्यांनी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली ते भौतिकशास्त्रज्ञ व प्राध्यापक होते.असे सांगितले.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ते उपप्राचार्य प्रा.एम डी खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना संशोधक व चिकित्सक वृत्ती जोपासली पाहिजे डॉ.रमन यांनी पावसाळ्यातील थंड वातावरणातील इंद्रधनुष्यातील सात रंग रूपाकडे निरीक्षण करून बदल शोधून काढले,संशोधनातील निष्कर्ष,कल्पना करून नविन ज्ञान शोधून काढले पाहिजे,जगाचा अन्नदाता शेतकरी हा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून बदल शोधून काढतो,स्वयंपाक करणारी गृहिणी ही सुद्धा स्वयंपाक घरात मिक्सर,कुकर,गॅस सिलिंडर, गॅसशेगडी,भांडे घासण्यासाठी मशीन वापरते हा विज्ञानाचा शोध आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विज्ञान हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच संशोधनासाठी अत्याधुनिक माध्यम आहे.यांत्रिकिकरणामुळे मानवाचे श्रम कमी झाले जीवनशैलीमध्ये तसेच आहारात बदल झाला आहे. सेंद्रिय शेती युक्त अन्न नसल्याने तसेच रासायनिक खत युक्त अन्न आहारात जास्त प्रमाणात वापर होत असल्याने मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिन,साखरेचे प्रमाण कमी होते.प्रथिनीयुक्त फळे,ताजा भाजीपाला वापरणे तेलकट पदार्थ टाळावेत शुध्द पाणी घ्यावे.हे टाळल्यामुळे वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना पी.पी.टी.स्लाईड्सवर डॉ.बिमल छाजर ( ह्दय विकार तज्ज्ञ ) यांचे मार्गदर्शन झाले.डॉ. छाजर यांनी ह्दय हे शरीरातील मुख्य घटक आहे.सध्या लठ्ठपणामुळे ह्दयाचे झटके येतात त्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे.लठ्ठपणात व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मद्यपान,धुम्रपान, याचा समावेश होतो.आहारात जीवनसत्त्व युक्त फळे द्राक्ष,केळी, अंडी,गाजर,लिंबू,आवळा,बीटअशा फळांचा वापर करावा. उघड्यावरील खाद्य पदार्थ,हॉटेलचे पदार्थ टाळावेत मोकळ्या निसर्गरम्य वातावरणात ऑक्सिजन चांगला मिळतो अशा ठिकाणी फिरायला जावे असे सांगितले.
सुत्रसंचालन प्रा.इम्रान खान यांनी केले तर आभार डॉ.सुधीर कापडे यांनी मानले.कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,डॉ.प्रल्हाद पावरा, प्रा.मनोज पाटील,प्रा.राजू तडवी, डॉ.मयूर सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. निर्मला पवार,प्रा.ईश्वर पाटील,प्रा. सुभाष कामडी,प्रा.हेमंत पाटील, प्रा.सी.टी.वसावे,प्रा.प्रशांत मोरे,प्रा. अर्जुन गाढे,प्रा.रूपाली शिरसाट, प्रा.अश्विनी कोल्हे,मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर दुर्गादास चौधरी प्रमोद भोईटे,प्रमोद कदम,अनिल पाटील यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.