Monday, March 24, 2025
Homeजळगावयावल महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन.

यावल महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन.

यावल महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन.

यावल दि.२८  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दयाघन राणे ( डी.डी.एन.भोळे महाविद्यालय भुसावळ )यांनी विद्यार्थ्यांना “मोबाईल वापरायचे व्यसण व त्यामागील विज्ञान” या विषयावर पी.पी.टी स्लाईड्सवर मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देऊन प्रगती करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोबाईल फोनचा वापर आवश्यक त्यावेळीच करायला हवा सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाजवळ मोबाईल फोन आहे त्याच्या आहारी जास्त न जाता चांगले ज्ञान अवगत करावे असे सांगून लँडलाईन फोन, टेलिफोन,सॅटेलाइट्स ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच मोबाईलचे फायदे चांगली माहिती मिळवणे,प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती,अभ्यासक्रमाची माहिती, आरोग्य व योग्य आहार विषयक माहिती मोबाईलचे तोटे कोणतेही काम नसताना वेळ वाया घालवणे, नको त्या गोष्टी पाहणे, गरज नसताना लोकांशी, मित्रांची, नातेवाईकांशी जास्त बोलणे, व्हाट्सअप,इंस्टाग्राम, फेसबुक वर चॅटिंग करणे,युट्युब वरील अनावश्यक माहिती पाहणे हे आजच्या तरुणाईत जडलेले व्यसनच आहे असे सांगितले त्यामुळे कॅन्सर, डोपामाईन, सारखे आजार हे होऊ शकतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी सध्या स्पर्धेच्या युगात वावरत असताना स्वतःला आत्मभान जागृत केले पाहिजे, मोबाईलमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊन विस्मरण होते, परिस्थितीला अनुसरून विचार करणे,संशोधनात्मकवृत्ती जोपासली पाहिजे,जुन्या काळातील घरातील संस्कार,परिवर्तन, शिष्टाचाराची भाषा अंगीकृत करणे, नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्मकता व आत्मविश्वास बाळगणे आवश्यक आहे असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हेमंत भंगाळे यांनी केले सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,
प्रा.मयुर सोनवणे,प्रा.मनोज पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.निर्मला पवार, प्रा,ईश्वर पाटील,प्रा.रूपाली शिरसाट,प्रा.आश्विनी कोल्हे,प्रा. इमरान खान,प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.सी.टी.वसावे,प्रा.सुभाष कामडी, प्रा.हेमंत पाटील,प्रा.अर्जुन गाढे,प्रा. अक्षय सपकाळे,प्रा.प्रशांत मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी, प्रमोद भोईटे,प्रमोद कदम,अनिल पाटील, प्रमोद जोहरे,मनोज कंडारे दशरथ पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या