Monday, March 24, 2025
Homeजळगावयावल महाविद्यालयात स्री- पुरुष समानता विषयावर व्याख्यान संपन्न.

यावल महाविद्यालयात स्री- पुरुष समानता विषयावर व्याख्यान संपन्न.

यावल महाविद्यालयात स्री- पुरुष समानता विषयावर व्याख्यान संपन्न.

यावल दि.२५  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या. डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्री पुरुष समानता विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अमोल भालेराव (उप शिक्षक सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय यावल) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्री आणि पुरुष दोघांना समान अधिकार दिलेले आहेत.परंतु ते आचरणात आणले पाहिजे शिक्षण हे अज्ञान दूर करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.त्याचा वापर सत्कारात्मक विचार करताना केला पाहिजे त्यासाठी नकारात्मक विचार बाजूला ठेवून आत्मविश्वास, हिंमत, शौर्य बाळगून स्वतःला ओळखले पाहिजे समाजमान्य असे परिवर्तन घडवून मनातील भीती नष्ट केली पाहिजे असे सांगताना भालेराव यांनी रायगडावरील हिरकणीची गोष्ट सांगितली.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले हिंदू कोड बिलाचे,पंडिता रमाबाई,राजमाता जिजाऊ यांचेही उदाहरण देऊन सविस्तर माहिती सांगून आदर्श घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात निबंध लेखन व संवाद लेखन स्पर्धा पार पडल्या निबंध लेखन स्पर्धेत कु. दीपिका बारी ( F.Y.B.Com) प्रथम कु.दिक्षा पंडित ( S.Y.B.A) द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर संवाद लेखन स्पर्धेत कु.दिक्षा पंडित प्रथम क्रमांक तर कु.श्रध्दा पंडित ( F.Y.B.A) द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सध्याच्या युगात बदलत्या काळानुसार सामाजिक,मानसिक, नैसर्गिक विचारांचा प्रभाव जास्त पडतो त्यासाठी समयसूचकता ही महत्त्वाची आहे. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्रीया वेगवेगळे यशाचे शिखर गाठत आहेत.बसचालक,बस वाहक,विमान पायलट,राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्त्रिया महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.स्त्रियांमध्ये सहनशीलता हा सर्वात मोठा गुण आहे.परंतु आजची तरुण आणि तरुणाई ही नैराश्य विचाराने भरकटत चालली आहे.त्यासाठी जुने विचार आणि रूढी परंपरा बदलल्या पाहिजे नवीन विचार संस्कार अंगीकृत केले तर समाजात स्त्री- पुरुष समानता येईल तसेच अधिकाराबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून वागले पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या महापुरुषांची चरित्र वाचले पाहिजे यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन रॉय,शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे उदाहरण देऊन माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.दिक्षा पंडित हीने केले आभार डॉ.आर.डी.पवार यांनी मानले एवढे कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे,डॉ. हेमंत भंगाळे,डॉ निर्मला पवार, प्रा.सुभाष कामडी,प्रा.सी.टी. वसावे,प्रा.प्रशांत मोरे, प्रा.हेमंत पाटील,प्रा.प्रतिभा रावते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे संतोष ठाकूर दुर्गादास चौधरी प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या