यावल येथील कला वाणिज्य महाविद्यालयात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रथाचे आगमन.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रथाचे आगमन आणि स्वागत महाविद्यालयातर्फे करण्यात आले.
प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील रथाचे आगमन झाल्यानंतर नवीन शैक्षणिक धोरण २०२० व वाचन संकल्प महाराष्ट्राचा या विषयावर मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महेश कसबे ( मुक्त विद्यापीठ सहाय्यक नाशिक ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले,की नविन शैक्षणिक धोरण हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य युक्त आहे. या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य या तिन्हीही शाखेचे विषय अभ्यासण्याची संधी प्राप्त झाली आहे.वाचन संकल्प हा महाराष्ट्राचा उपक्रम वाचनाची गोडी आणि वाचनाचे फायदे ह्या संदर्भात उपयुक्त असून विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळायला हवे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नविन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त शिक्षणाबरोबर भविष्यातील रोजगाराची संधी आणि आजच्या तंत्रज्ञानाला अनुसरून आहे.शिक्षण घेणारा विद्यार्थी हा कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी पात्र ठरू शकतो शासकीय नोकरीच्या संधी बरोबर खाजगी रोजगाराची संधी प्राप्त करून देणारे आहे.वाचन हे काळाची गरज असून सध्याचे ऑनलाईन युगात विद्यार्थी वाचनापासून दूर झाला आहे.असे न करता पुस्तक वाचून ज्ञान ग्रहण होत असते,शब्द संपत्ती वाढत असते,त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता निरंतर वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाला कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,डॉ.प्रल्हाद पावरा ( केंद्र संयोजक),संतोष ठाकूर ( केंद्र सहाय्यक ),मिलिंद बोरघडे ( तांत्रिक सहाय्यक ),अनिल पाटील,प्रा.ईश्वर पाटील,प्रा.सि.टी. वसावे,प्रा.अर्जुन गाढे,प्रा.प्रतिभा रावते,प्रा.प्रशांत मोरे,प्रमोद भोईटे,दुर्गादास चौधरी,प्रमोद कदम,अमृत पाटील,आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.