यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न
यावल दि.२५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित यावल येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी निर्माण करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक व बक्षिस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हर्षल पाटील ( नाट्य कलावंत ) माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर
आर.डी.पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते हर्षल पाटील ( नाट्यकलावंत ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि रोजगार युक्त शिक्षण कौशल्यावर भर देणे ही आज काळाची गरज बनली आहे.जग प्रचंड वेगाने बदलते त्याला अनुसरून अपेक्षित बदल करणे,शिक्षणातील पुस्तकी ज्ञान जितके महत्त्वाचे आहे.तितकेच व्यावहारिक दृष्ट्या आर्थिक बाबतीत सक्षम होण्यासाठी रोजगाराच्या संधी शोधणे महत्त्वाचे आहे.तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात मोबाईल व हौशी मौजेच्या गोष्टींकडे गुरफटलेली आहे.पण तसे न करता समाजात प्रतिष्ठित माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी शिक्षणाला,गुणवत्तेला अनुसरून नोकरी व्यवसाय करणे,स्वतःची मानसिकता बदलणे,भविष्यातील अंदाज पाहून वर्तवणूक करणे,हे पण महत्त्वाचे आहे.चांगल्या व्यक्तीची ओळख ही गुणवत्ता व कामावरून होत असते.त्यामुळे वेळेचं भान ठेवून नियोजन करून अभ्यास करणे तसेच नीटनेटकेपणा योग्य भाषाशैली अंगीकृत करणे महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ते माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन करताना सध्याच्या काळात एमपीएससी,यूपीएससी ह्या परीक्षा नोकरी व करिअर संदर्भात महत्त्वाचे माध्यम आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मनात कमीपणा वाटून न घेता जिद्द ठेवून अभ्यासाला सामोरे जायचे त्यांनी आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी नवीन स्वप्न बघणे आणि उद्याचा नागरिक घडण्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणे ही बाब लक्षात ठेवून वर्तमानकाळाची पावले ओळखून वावरणे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देऊन नियोजन पूरक अभ्यास व कठोर परिश्रम घेऊन घवघवीत यश संपादन केले पाहिजे,कौशल्य युक्त शिक्षण ही काळाची गरज ओळखून त्यावर भर देणे महत्त्वाचे आहे. असे सांगितले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.संजय पाटील,
प्रा.चिंतामण पाटील यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार तसेच मिलिंद बोरघडे,दशरथ पाटील यांना गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या बरोबरच प्रा.इमरान खान ( उर्दू ), प्रा.रूपाली शिरसाट, ( रसायनशास्त्र ),प्रा.आश्विनी कोल्हे( रसायनशास्त्र ), प्रा.हेमंत पाटील ( मराठी ) हे सेट,नेट परीक्षा पास झाल्याबद्दल तर डॉ.मयुर सोनवणे यांनी प्राणीशास्त्र विषयात पी.एच्.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कनिष्ठ विभागातील बारावी कला,विज्ञान व किमान कौशल्य, तसेच वरिष्ठ विभागातील कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील २०२३-२४ तृतीय वर्षात वेगवेगळ्या विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच क्रीडा स्पर्धेत, संगीत खुर्ची,रांगोळी,मेहंदी,निबंध लेखन,अर्ज लेखन, संवाद लेखन, पुस्तक परीक्षण स्पर्धा यात प्रथम, द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे गुणवत्ता प्रमाणपत्र व ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम. डी.खैरनार यांनी केले,सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.सुधीर कापडे यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे, डॉ.आर.डी. पवार,डॉ.प्रल्हाद पावरा,प्रा.मनोज पाटील,प्रा.सोनाली पाटील,प्रा.राजू तडवी,प्रा.संजीव कदम,प्रा.राजेंद्र थिगळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी डॉ.निर्मला पवार, डॉ.वैशाली कोष्टी,डॉ.संतोष जाधव, प्रा.सुभाष कामडी,प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.मनिष बारी,प्रा.प्रशांत मोरे,प्रा. सी.टी.वसावे,दुर्गादास चौधरी, संतोष ठाकूर,प्रमोद भोईटे,प्रमोद कदम,अनिल पाटील,प्रमोद जोहरे, अमृत पाटील यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.