यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये स्पोर्ट डे मोठ्या उत्साहात साजरा.
यावल दि.१४ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज शुक्रवार दि. फेब्रुवारी २०२५ रोजी यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधे स्पोर्ट डे sport’s Day संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे अध्यक्ष शरदभाऊ जिवराम महाजन उपस्थित होते.तसेच
शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन मॅम व दिपाली धांडे मॅम आणि ITI कॉलेज यावल येथील प्रविण झोपे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि मशाल प्रज्वलित करून करण्यात आली.
कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या विद्यार्थीनींनी दुपट्टा ड्रिलचे मनमोहक असे सादरीकरण केले तसेच मूलांचा उत्साह वाढवण्यासाठी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चेअरप डान्स देखिल सादर केला.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदभाऊ महाजन यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले तसेच प्रिन्सिपल दिपाली धांडे मॅम यांनी क्रार्यक्रमा प्रसंगी मुलांना मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 8th ( Eng ) च्या विद्यार्थिनी शांभवी कवडिवाले व मिताली कोल्हे यांनी केले.त्यांना शाळेच्या शिक्षिका प्रियंका फेगडे मॅम आणि प्रिती भार्गव मॅम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाचे
vote of thanks सोलेहा खान यांनी केले.या कार्यक्रमाची रूपरेषा पर्यवेक्षिका श्रीमती लोखडे मॅम व गौरी भिरूड मॅम यांच्या मार्गदर्शनाने आखली आजच्या
कार्यक्रमामध्ये Running, Book Balence, Balloon Race, Lemon Spoon, थाळी फेक असे
विविध खेळ खेळण्यात आले.