यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा.
यावल दि ८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त येथील बाल संस्कार विद्या मंदिरात व जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बाल संस्कार विद्या मंदिरात
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मोहिनी गर्गे यांच्या हस्ते सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले .
त्यानिमित्त शाळेत संगीत खुर्ची,टिकली लावणे,बादलीत बॉल टाकणे इत्यादी अशा स्पर्धा घेण्यात येऊन बेबाबाई आढळकर,स्वाती बाविस्कर,प्रतिभा सराफ,दिपाली बडगुजर यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
आदर्श माता पालक म्हणून सुवर्णा पंकज गडे यांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला कु.सानवी गडे हिने अतिशय उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे सौ.मंदा काकू वाणी.सौ.ज्योतीताई वाणी यांनी महिलांचे स्वागत केले व मनोगत व्यक्त केले.संस्थाध्यक्ष महेश वाणी यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी,अतुल गर्गे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
याचप्रमाणे येथील जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम,प्राचार्या श्रीमती,दिपाली धांडे मॅडम, पर्यवेक्षिका सौ.गौरी भिरुड मॅडम, श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम उपस्थित होत्या.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सौ.अर्चना पाटील” यांनी.महिला दिनाबददल माहिती सांगितली कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.