Tuesday, April 29, 2025
Homeजळगावयावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व बाल संस्कार विद्या...

यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व बाल संस्कार विद्या मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व बाल संस्कार विद्या मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

यावल दि.३   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी.  यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये तसेच बाल संस्कार विद्या मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दि.३ जानेवारी २०२५ रोजी शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक सुधाकर सरोदे सर, ज्योती विद्या मंदिर प्राथमिक शाळा, सांगवी यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. व इयत्ता ३ री व ४थीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषणे दिली. तसेच इयत्ता १ ली मधील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारली.याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन सर व संस्थेचे संचालक शशीकांत फेगडे सर,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शीला तायडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली फेगडे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमास प्रशांत फेगडे सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

तसेच येथील बाल संस्कार विद्या मंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींची बालसभा घेण्यात आली.या बाल सभेचे अध्यक्षस्थान कुमारी विनिता फालक इ.७ वी ची विद्यार्थिनी, शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ.सविता वारके मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नाटिका सादर केली.विद्यार्थ्यांनी बालिका दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. यात सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी यांच्या कार्याविषयी इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सानवी गडे इ.६ वी तर आभार प्रदर्शन कुमारी दामिनी फालक हिने केले.शाळेच्या सर्व शिक्षकांनी बाल सभेची कामे विद्यार्थ्यांना वाटून दिली.विद्यार्थ्यांना आवडीचे काम मिळाल्याने त्यांचा उत्साह अतिशय छान होता.प्रत्येकाने आपली भूमिका व्यवस्थित पार पडली त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यात आला.

भाषणात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र फालक सर यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पेन बक्षीस स्वरूपात देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन विद्यार्थ्यांनी केले होते.सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे याचा स्व अनुभव मिळाला. बालसभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या